• Download App
    KYC | The Focus India

    KYC

    Aadhaar App : नवे आधार अ‍ॅप; फेशियल रिकग्निशन, क्यूआरद्वारे केवायसी; आता फक्त आवश्यक डेटा शेअर करा

    भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) नवीन आधार अ‍ॅप लाँच केले आहे. सध्या आधार आणि जुने अ‍ॅप एमआधार दोन्ही काम करतील. नवीन अ‍ॅपमध्ये चेहऱ्याची ओळख, बायोमेट्रिक लॉक आणि क्यूआर कोड-आधारित शेअरिंगसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ते कुठेही केवायसी पडताळणीची परवानगी देते. पूर्वी वापरकर्त्यांना त्यांचे संपूर्ण आधार कार्ड दाखवावे लागत असे. परंतु या अ‍ॅपमध्ये वापरकर्ते कोणती माहिती दाखवायची आणि कोणती लपवायची हे निवडू शकतात. यामुळे आधार कार्डची फिजिकल कॉपी बाळगण्याची गरज भासणार नाही. ते अँड्रॉइड आणि आयआेएस दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

    Read more

    Aditi Tatkare : मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या- लाडकी बहीण योजनेतील केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर, परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय

    राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेकांकडून केवायसीची मुदतवाढ मागणी होत आहे.

    Read more

    आज 31 जुलै : पीएम किसान योजनेसाठी KYC आणि ITR भरण्याची शेवटची संधी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज 31 जुलै ही अनेक महत्त्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे. किसान सन्मान निधीसाठी तुम्ही अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न आणि केवायसी […]

    Read more

    एसबीआयच्या ग्राहकांनो सावधान, चीनी हॅकर्सकडून केवायसीच्या नावाखाली होतेय फसवणूक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न चीनी हॅकर्सकडून होत आहे. केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली हे हॅकर्स व्हॉटसअ‍ॅपवरून […]

    Read more