Kiren Rijiju : केंद्रीय मंत्र्यांनी 15 हजार फूट उंचीवर गाणे गायले; रिजिजू म्हणाले- हिमाचलमध्ये गाणे कठीण
हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी लाहौल-स्पिती येथील १५ हजार फूट उंचीवरील कुंजम खिंडीत एका खास पद्धतीने संगीताचा आनंद घेतला. त्यांनी पार्श्वगायक मोहित चौहान आणि खासदार कंगना राणौत यांच्यासोबत एक गाणे गुणगुणले, ज्याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला.