Dombivli : जमीन नोंदीसाठी महसूल मंत्र्यांच्या सही – शिक्क्याचा गैरवापर, महसूल विभागाच्या विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र, गुन्हा दाखल
जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातील महसूल दप्तरी नोंद करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला. मंत्रालयातील महसूल विभागाच्या एका विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र वापरून हा आदेश काढण्यात आला होता. तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार समोर आला असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला आहे.