Manoj Jarange : मनोज जरांगेंचा इशारा- मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येत आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे तसेच विनंती देखील केली आहे की मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ, असे म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.