Kunal Kamras : कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या ; शिवसेना नेत्याने EOW कडे दाखल केली तक्रार
विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या अडचणी सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता, कामराविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) लेखी तक्रार देण्यात आली आहे. यामध्ये त्याला मिळणाऱ्या पैशांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.