Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराप्रकरणी 16 एप्रिल रोजी पुढील सुनावणी; गुन्हे रद्द करण्याची मागणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन कविता करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई, नाशिक, जळगावात दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी झाली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी ही 16 एप्रिल रोजी होणार आहे.