Kumbh Mela : महाराष्ट्रातही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नवीन कायदा अन् प्राधिकरण तयार करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण केले.