Kudankulam : भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; दावा- हॅकर्सनी माहिती डार्क वेबवर टाकली
भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कुडनकुलमशी संबंधित हजारो दस्तऐवज लीक झाले आहेत. रॉयटर्सनुसार, ‘वर्ल्ड लीक्स’ या हॅकर्स ग्रुपने हे दस्तऐवज डार्क वेबवर अपलोड केल्याचा दावा केला आहे. यामध्ये पॉवर प्लांटच्या काही भागांचे ब्लूप्रिंट, पुरवठादारांची माहिती आणि इतर रेकॉर्ड सार्वजनिक करण्यात आले आहेत.