भगवा रंग धर्माचे, तर कोविदार वृक्ष रघुकुलाचे प्रतीक!!
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर फडकलेला धर्मध्वज भगव्या रंगाचा आणि त्यावर कोविदार वृक्ष अंकित आहे. कारण भगवा रंग हा धर्माचे प्रतीक आहे तर कविता वृक्ष हा रघुकुलाचे म्हणजेच श्रीरामांच्या वंशाचे प्रतीक आहे. याचे महत्त्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आजच्या कार्यक्रमात विशेषत्वाने सांगितले.