Parth Pawar : पार्थ पवारांचा 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदीचा सौदा रद्द, 40 एकरांवरील 21 कोटी मुद्रांक शुल्कही माफ केले होते
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी नियम धाब्यावर बसवून स्वत:च्या कंपनीसाठी केलेला १८०० कोटींचा भूखंड व्यवहार उघडकीस आल्यावर ३२ तासांतच रद्द करण्यात आला. पार्थ यांनी त्यांच्या अमेडिया कंपनीसाठी कोरेगाव पार्क येथे महार हडोळता वतनाची ४० एकर जमीन खरेदी केली. बाजारात १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत खरेदी करताना त्यांना २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. या प्रकरणी विरोधकांनी ६ नोव्हेंबर रोजी एकच गदारोळ केला. रस्त्यावर आंदोलने सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नियुक्त केली. पहिल्या टप्प्यात तहसीलदार, सहायक दुय्यम निबंधकाला निलंबित करण्यात आले. पार्थ पवार यांना वगळून अमेडिया कंपनीतील पार्थ यांचे भागीदार तसेच जमीन व्यवहारात सहभागी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात