Kolkata rape : कोलकाता रेप-मर्डरप्रकरणी दोषी संजयला जन्मठेप; कोर्टाने म्हटले- हे रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरण नाही
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला सोमवारी १६४ दिवसांनंतर सियालदाह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने म्हटले, ‘हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही.’ त्यामुळे मृत्युदंड देता येणार नाही.