Kolkata Law College : कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरण : दोन दिवस आधीच रचला होता कट, आरोपींची योजना तपासात उघड
कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या २४ वर्षीय विधी विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात गंभीर खुलासे समोर येत आहेत. या गुन्ह्याचा कट आरोपींनी दोन दिवस आधीपासूनच रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा (३१), जो कॉलेजचा माजी विद्यार्थी असून सध्या कर्मचारी आणि तृणमूल काँग्रेसचा विद्यार्थी शाखेचा सक्रिय नेता आहे, त्याच्यासोबत झैब अहमद आणि प्रमीत मुखर्जी या दोन सध्याच्या विद्यार्थ्यांनी हा घृणास्पद गुन्हा केला, असा आरोप आहे.