Ad Guru Piyush Pandey : ‘अबकी बार मोदी सरकार’ लिहिणारे पीयूष पांडे यांचे निधन; “हमारा बजाज” आणि “थंडा मतलब कोका कोला” जाहिरातींमुळे प्रसिद्ध
जाहिरात गुरू पीयूष पांडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते “अबकी बार मोदी सरकार” या घोषवाक्याचे आणि “मिले सूर मेरा तुम्हारा” या गाण्याचे लेखक होते. सुहेल सेठ यांनी एक्सवरील एका पोस्टद्वारे त्यांच्या मृत्यूची घोषणा केली.