Kishor Shinde : आयुक्त अन् किशोर शिंदे यांच्यातील भांडण सुरक्षा रक्षकांना भोवले!
महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी (ता.६) मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा तेथील सुरक्षा रक्षकांसाठी डोकेदुखी होऊन बसलाय. सुरक्षेत हयगय केल्याप्रकरणी त्यावेळी कामावर असणाऱ्या कंत्राटी आणि कायम सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.