US-Russia : ट्रम्प-पुतिन अधिकाऱ्यांमधील गुप्त बैठकीवरून वाद; युक्रेन युद्ध संपवण्याची योजना येथेच रचल्याचा दावा
युक्रेन संघर्ष संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीमुळे वाद निर्माण झाला आहे. रॉयटर्सच्या मते, अमेरिकेच्या परराष्ट्र विभाग आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील अनेक अधिकाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीची माहिती नव्हती.