France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती
फ्रान्सने वसाहतकालीन तीन कवट्या मादागास्करला परत केल्या आहेत. यापैकी एक कवटी मालागासी राजा टोएरा यांची असल्याचे मानले जाते१८९७ मध्ये, फ्रेंच सैनिकांनी राजा टोएरा यांचा शिरच्छेद केला. त्यावेळी फ्रान्सने ती ट्रॉफी म्हणून पॅरिसला नेली आणि राष्ट्रीय इतिहास संग्रहालयात ठेवली. इतर दोन कवट्या सकलावा वांशिक गटाच्या आहेत.