Kim Jong : किम जोंग यांची ट्रम्प यांना खुन्नस! क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी करून अमेरिकेला दिला इशारा
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एकप्रकारे ललकारले आहे. रविवारी क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी घेतल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचा दावा केला आहे. अमेरिका-दक्षिण कोरियाच्या लष्करी सरावांच्या संख्येत वाढ झाल्यास ‘कठोर’ प्रतिसाद देण्याचा माझा संकल्प आहे, असे किम जोंग म्हणाले. उत्तर कोरियाने या वर्षी तिसऱ्यांदा क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी केली