Nitesh Rane : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
जिल्ह्यात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरून हा संघर्ष वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आता जशास तसे उत्तर देत थेट आव्हान दिले आहे.