Kho-Kho World Cup भारतीय पुरुष संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकला
भारतीय पुरुष संघाने रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या खो खो विश्वचषक २०२५ चे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा ५४-३६ असा पराभव केला.