Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर वादग्रस्त संवाद हटवणार
खालिद का शिवाजी’ शिवाजी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील काही संवादांवरून अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाचा तीव्र विरोध केला जात आहे. चित्रपटाला वाढता विरोध पाहता, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक पत्रक जाहीर करून वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. “सिनेमाच्या आशयामुळे कोणाच्या भावना दुखावाव्यात, असा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे संबंधित दृश्ये आणि संवाद पुन्हा एकदा तपासले जात असून, आक्षेपार्ह भाग हटवला जाणार आहे.” असे निर्मात्यांनी म्हटले आहे.