Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे नैतिकता रसातळाला, आजचा घटनाक्रम 2019 च्या घडामोडींचे पीक; भाजपचे टीकास्त्र
भाजपने शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.