Kerala : सेल्स टार्गेट पूर्ण न केल्याने केरळच्या कंपनीत कर्मचाऱ्याला अमानुष शिक्षा, कुत्र्याचा पट्टा गळ्यात, कपडे काढले
सध्या केरळमधील एका मार्केटिंग फर्मचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका माणसाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधलेला दिसतो आहे. दुसरा एक माणूस त्याला कुत्र्याप्रमाणे चालवत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, काही कर्मचारी कोणाच्यातरी आदेशानुसार त्याचे कपडे काढताना दिसत आहेत