Kerala High Court : केरळ हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, शिक्षकांना हाती छडी घेऊ द्या, मुलांमध्ये शिस्त राखण्यासाठी पुरेशी!
शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी आधी त्याची चौकशी व्हावी, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन म्हणाले, दुर्भावना न बाळगता केलेल्या शिक्षेसाठी शिक्षकांचा गुन्हेगारी प्रकरणापासून बचाव केला पाहिजे. न्यायालयाने केरळच्या पोलिस महासंचालकांना यासंबंधी एक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. ते एक महिन्यात लागू करण्याचेही आदेश दिले.