Kerala government : थरूर यांनी मोदी व केरळ सरकारचे केले कौतुक; केरळ काँग्रेसने म्हटले- पक्षाच्या आशा दुखावू नये, कार्यकर्त्यांना फसवू नये
केरळ काँग्रेसच्या मुखपत्राने खासदार शशी थरूर यांचे नाव न घेता त्यांना सल्ला दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाच्या आशा धुळीस मिळवू नयेत, असे वीक्षणम डेलीच्या संपादकीयात म्हटले आहे. येणाऱ्या निवडणुकीपूर्वी हजारो पक्ष कार्यकर्त्यांच्या आशांना तडा देऊ नका.