Kedarnath : चारधामबाबत मोठी बातमी ; केदारनाथ अन् बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडणार
उत्तराखंडच्या अप्पर गढवाल हिमालयीन प्रदेशात असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात सुमारे सहा महिने बंद राहिल्यानंतर भाविकांसाठी पुन्हा उघडले जातील आणि त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे २ मे रोजी उघडतील, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे ४ मे रोजी उघडतील. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय प्रसाद थापलियाल यांनी ही माहिती दिली आहे.