K Kavitha : के. कविता यांची घोषणा- नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार; 2029ची विधानसभा निवडणूकही लढवणार
भारतीय राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांनी सोमवारी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. कविता या माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या कन्या आहेत. कविता म्हणाल्या की, त्यांची संघटना ‘तेलंगणा जागृती’ 2029 ची विधानसभा निवडणूक नक्की लढवेल. त्यांनी स्पष्ट केले की, त्या आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या BRS पक्षात परतणार नाहीत.