Kathmandu : नेपाळमध्ये राजेशाहीच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर, काठमांडूत मोठी निदर्शने
नेपाळ प्रजासत्ताकाच्या स्थापनेला १६ वर्षे लोटली. परंतु आता राजधानी काठमांडूत राजेशाहीची पुनर्स्थापना व्हावी या मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (आरपीपी) व इतर अनेक राजेशाही समर्थक संघटनांकडून ही निदर्शने झाली होती. नेपाळमधील राजेशाही व्यवस्था पुन्हा यावी असा त्यांचा त्यामागील उद्देश आहे. माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांनी लोकशाहीदिनी एक संदेश दिला.