Nepal PM Oli : नेपाळचे माजी PM ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई; गृहमंत्री आणि इतर तीन अधिकाऱ्यांनाही हाच आदेश
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि इतर पाच जणांना काठमांडू सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये माजी गृहमंत्री रमेश लेखक, गृहसचिव गोकर्ण मणी दुवाडी, अंतर्गत गुप्तचर प्रमुख हट राज थापा आणि काठमांडूचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी छबी रिजाल यांचा समावेश आहे.