काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी आज हल्ला केला पर्यटकांवर गोळीबार करून त्यांनी काही लोकांना जखमी केले. या संदर्भातली तपशीलवार माहिती अद्याप हाती यायची असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र सौदी अरेबियातून या हल्ल्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.