Sajad Lone : जम्मू-काश्मीरला दोन स्वतंत्र राज्ये बनवण्याची मागणी; सज्जाद लोन म्हणाले- सलोख्याने वेगळे होण्यावर विचार करण्याची वेळ
पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी जम्मू आणि काश्मीरला दोन स्वतंत्र राज्यांमध्ये विभागण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, आता दोन्ही प्रदेशांमध्ये सलोख्याने वेगळे होण्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.