Karuna Munde : कोर्टाचा धनंजय मुंडेंचा दणका, करुणा मुंडेंना 2 लाख पोटगीचा निर्णय कायम!
करुणा मुंडे यांना २ लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय शनिवारी माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. या आदेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते.