Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले
१७ एप्रिल रोजी, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील साई स्फुर्ती पीयू कॉलेजमध्ये, एका विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिल्याने त्याला परीक्षेला बसू देण्यात आले नाही. शनिवारी हे प्रकरण चर्चेत आले आणि त्यावरून वाद निर्माण झाला. आता या प्रकरणात प्राचार्य डॉ. चंद्रशेखर बिरादार आणि कर्मचारी सतीश पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.