Karnataka : कर्नाटकात इस्रायली पर्यटकावर सामूहिक बलात्कार; आरोपींनी त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले
कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपी येथे एका २७ वर्षीय इस्रायली महिला पर्यटक आणि एका होम-स्टे मालकिणीवर तीन पुरूषांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना ६ मार्च रोजी रात्री १०:३० वाजता तुंगभद्रा कालव्याच्या काठावर घडली. पीडित महिला कालव्याच्या काठावर बसल्या होत्या.