CM Siddaramaiah : CM सिद्धरामय्या यांचा राष्ट्रपतींना प्रश्न- तुम्हाला कन्नड येते का? भाजपचा पलटवार- सोनियांना विचारण्याची हिंमत आहे का?
१ सप्टेंबर रोजी म्हैसूर येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (AIISH) चा सुवर्ण महोत्सवी समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या. प्रोटोकॉलनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील उपस्थित होते. स्वागत भाषणादरम्यान सिद्धरामय्या यांनी राष्ट्रपतींना विचारले की त्यांना कन्नड भाषा येते का, कारण ते कन्नडमध्ये भाषण देणार होते.