Karnataka Chief Minister : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला EDची नोटीस; हायकोर्टाची स्थगिती, जमीन घोटाळ्याचा आरोप
कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना पाठवलेल्या ईडीच्या नोटीसला स्थगिती दिली आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने पार्वती यांना नोटीस बजावली होती. पुरावे आणि रेकॉर्ड सादर करण्यासाठी त्यांना 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ईडीच्या बंगळुरू कार्यालयात बोलावण्यात आले.