Kapil Mishra : दिल्ली दंगलीप्रकरणी कपिल मिश्रा यांना मोठा धक्का
ईशान्य दिल्ली दंगली प्रकरणात, दिल्ली सरकारचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कपिल मिश्रा यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. कपिल मिश्रा यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या जातीय दंगलींमध्ये कपिल मिश्रा यांच्या कथित भूमिकेची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.