Kanhaiya Kumar : एकनाथ शिंदेंकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही, कन्हैया कुमारांची जहरी टीका
काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), उत्तर प्रदेश सरकार आणि मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही वैयक्तिक टीका करत, “अमित शाह यांनी एका पायावर उभं राहायला सांगितलं तर ते तसेही उभे राहतील,” असा टोला लगावला.