Kangana Ranaut : कंगनाला दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; महिला शेतकऱ्याला 100 रुपयांत आंदोलन करणारी म्हटले होते
हिमाचलमधील मंडी येथील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या टिप्पण्यांवरून दाखल करण्यात आलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.