Kalyan West : कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले
कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू असलेली एक ४ ते ५ मजली भलीमोठी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी जागेवरच कोसळली. या दुर्घटनेचे दृश्य अत्यंत चित्तथरारक असून, इमारत कोसळतानाचा थेट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या भयानक दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.