Anjali Damania : भुजबळांना मिळालेल्या क्लीन चीटवर अंजली दमानियांचा संताप, हायकोर्टात जाण्याचा निर्णय
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (ACB) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) केसमध्येही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. “छगन भुजबळांवरील सर्व प्रकरणे संपलेली नाहीत, त्यांना कोणतीही क्लीन चिट मिळालेली नाही. आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे त्यांनी सांगितले. तसेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.