Kailas Mansarovar : भारत – चीन दरम्यान ‘कैलास मानसरोवर’ यात्रा पुन्हा सुरू होणार!
भारत आणि चीनने सोमवारी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंध ‘स्थिर आणि पुनर्संचयित’ करण्यासाठी काही लोककेंद्रित पावले उचलण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बीजिंगमध्ये त्यांचे चिनी समकक्ष सन वेइडोंग यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.