Pigeons at Dadar : दादरचे कबुतरखाना प्रकरण; अन्न-पाणी देण्यावर बंदी कायम; तज्ज्ञ समितीने सखोल अभ्यास करण्याचे न्यायालयाकडून निर्देश
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी कबुतरखान्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली होती. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली होती. त्यानंतर आज देखील दादरमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज उच्च न्यायालयात झाली. यात न्यायालयाने आधी दिलेला आदेश कायम ठेवला आहे. इतकेच नाही तर आदेशाचे पालन केले जाईल, याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.