Pakistan : पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये युद्ध परिस्थिती; पाकने म्हटले- 133 अफगाण सैनिक ठार, 200 हून अधिक जखमी; भारताचा तालिबानला पाठिंबा
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी हवाई दलाने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले आहेत. दरम्यान, तालिबानने इस्लामाबादच्या फैजाबाद लष्करी तळासह अनेक प्रमुख लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.