K. Kavitha : केसीआर यांनी मुलगी कविता यांना पक्षातून निलंबित केले; म्हणाले- BRS विरोधी कारवायांमध्ये सहभागी:
भारतीय राष्ट्र समिती (BRS) ने मंगळवारी एमएलसी के. कविता यांना पक्षातून निलंबित केले. कविता यांचे वडील आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी हा निर्णय घेतला. बीआरएसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “कविता यांच्या कारवाया पक्षाविरुद्ध होत्या. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.”