Actress Jyoti Chandekar : तेजस्विनी पंडितच्या मातोश्री ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन; वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी (१६ ऑगस्ट) दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. ज्योती चांदेकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत.