Justice Vishwanathan : कोळसा घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती विश्वनाथन यांची सुनावणीपासून माघार; याच खटल्यात होते वकील
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांनी गुरुवारी कोळसा घोटाळ्याच्या सुनावणीपासून स्वतः माघार घेतली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका खटल्यात आपण वकील म्हणून हजर झालो होतो, त्यामुळे आपले नाव मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.