Vice President : उपराष्ट्रपती म्हणाले- न्यायमूर्ती वर्मा प्रकरणात तत्काळ FIR आवश्यक; एवढी रोख रक्कम कुठून आली हे जाणून घेणे महत्त्वाचे
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा प्रकरणी तात्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. ते म्हणाले – हे केवळ चिंताजनक नाही, तर ते आपल्या न्यायव्यवस्थेचा पाया हादरवणारे आहे.