Supreme Court कॉलेजियमच्या निर्णयाशी जस्टिस नागरत्ना असहमत; सुप्रीम कोर्टात न्या. पंचोली यांच्या नियुक्तीला आक्षेप
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना यांनी पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याच्या कॉलेजियमच्या शिफारशीला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की ही नियुक्ती न्यायव्यवस्थेसाठी हानिकारक ठरू शकते. २५ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती पंचोली यांची नावे केंद्राकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पाठवण्यात आली.