Justice Gavai : मणिपूर हिंसाचारावर चर्चा झाली, तर तोडगा दूर नाही; जस्टिस गवई म्हणाले- राज्यात सर्वांना शांतता हवी
सर्व समस्या संवैधानिक पद्धतीने सोडवता येतात, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी रविवारी सांगितले. जेव्हा संवाद असतो, तेव्हा उपाय सहज सापडतात.न्यायमूर्ती गवई म्हणाले, ‘मणिपूरमधील लोक वांशिक संघर्षामुळे खूप त्रस्त आहेत. सर्वांनाच शांतता प्रस्थापित करायची आहे. सध्याची स्थिती कायम ठेवण्यात कोणालाही रस नाही.”