Advocate Asim Sarode : ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द:महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलची मोठी कारवाई; पुढील 3 महिने कोर्टात करता येणार नाही युक्तिवाद
\
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सोमवारी सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिला. असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाही.